‘बेस्ट’च्या ‘इलेक्ट्रिक बस’ कंत्राटाचा वाद

03 May 2022 12:21:51
 

as 
 
 
 
 
 
मुंबई : ’बेस्ट’ उपक्रमासाठी करण्यात येणारी बस खरेदी आणि राबविण्यात येणार्‍या प्रक्रियेवरून मागील काही दिवसांपासून नवनवीन वाद उद्भवत असताना भाजपचे आमदार अमित साटम यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे. आ. अमित साटम यांनी सोमवार, दि. २ मे रोजी आपल्या अधिकृत ‘ट्विटर हॅण्डल’वरून याबाबत ट्विट करून निविदेच्या संदर्भात एक आक्षेप नोंदवला आहे.
 
 
कंत्राट युकेमधील कंपनीलाच!
 
 
आपल्या ट्विटमध्ये आ. अमित साटम म्हणाले की, “मुंबई महापालिकेकडून ‘इलेक्ट्रिक बसेस’च्या संदर्भात काढण्यात आलेल्या निविदेवर मी आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासनाकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले होते. मी केलेल्या आरोपांनंतर निविदेसाठी सात दिवसांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये हे कंत्राट युनायटेड किंगडममधील ‘कॉसिस ई-मोबिलिटी’ला दिली जाईल, हेदेखील मी आज जाहीर करतो आहे.” असे आ. अमित साटम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0