'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचे पोस्टर लाँच

28 May 2022 16:25:04
 
veer sawarkar
 
 
 
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९व्या जयंती निमित्ताने त्यांच्या चरित्रावर आधारित आगामी हिंदी चित्रपटातील बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टर मध्ये  'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' अशी भारीभक्कम टॅगलाईन  देण्यात आली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी चरित्रात्मक चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे.
 
 
 
तर ह्या चित्रपटाचे शुटींग येत्या ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे असे सांगण्यात आले आहे. हे पोस्टर चाहत्यांबरोबर शेअर करताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, ''रणदीप हुड्डाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत आपल्या समोर प्रस्तुत करताना सर्वप्रथम सर्वांना वीर सावरकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! इथे प्रत्येकाच्या मनात वीर सावरकरांबाबत वेगवेगळे विचार असू शकतात; परंतु या चित्रपटाचा दिग्दर्शक म्ह्णून मी हेच मांडू इच्छितो जे वीर सावरकरांकडे होते. त्यामुळे या सिनेमाच्या पटकथेत आणि चरित्रात आम्ही कोणतीच तफावत ठेवलेली नाही, त्यामुळे वीर सावरकरांच्या चरित्रातील वास्तवात काहीही बदल केलेला
 नाही. ते स्वातंत्र्यवीर होते आणि त्यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही.''
Powered By Sangraha 9.0