यासिन मलिकच्या समर्थनार्थ शाहिद आफ्रिदीची मुक्ताफळं

25 May 2022 16:58:55

yasin malik 
 
 
मुंबई : टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकविरोधात दिल्लीतील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र यासिन मालिकला शिक्षा होणार यामुळे पाकीस्तानच्या पोटात दुखत असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानी क्रिकेट पटू शाहिद आफ्रिदी याने यासिन मलिकच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
 
 
 
"मानवी हक्कांच्या निर्घृण उल्लंघनाविरुद्ध गंभीर आवाज बंद करण्याचे भारताचे सततचे प्रयत्न व्यर्थ आहेत. यासिन मलिक यांच्यावरील बनावट आरोपांमुळे काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अडथळा येणार नाही. संयुक्त राष्ट्राने काश्मीरच्या नेत्यांवर अन्यायकारक आणि बेकायदेशीर कारवाईची दाखल घ्यावी," अशा शब्दात शाहिद आफ्रिदीने यासिन मलिकचे समर्थन केले आहे.
Powered By Sangraha 9.0