दाऊद कराचीतच! : भाचा अलीशाह पारकरचा खुलासा!

24 May 2022 14:29:49

daud ibrahim
 
 
 
 
 
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतच असल्याचा मोठा खुलासा त्याचाच भासा अलीशाह पारकर याने केला आहे. ईडीला दिलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे. दाऊदशी आपण संपर्कात नसल्याचीही माहिती ईडीने दिली आहे. दरम्यान, ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पारकर कुटूंबाचा संपर्क दाऊदशी होत नसतो. मात्र, ईद आणि इतर सणांना त्याच्याशी संपर्क होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
 
 
 
अलीशाह पारकरने दिलेल्या जबाबात आपल्या आईच्या कारनाम्यांचाही खुलासा केला आहे. "हसीना पारकर एक गृहिणी होती मात्र, तिने उपजीविकेसाठी सौदे करत होती. तो म्हणाला, 'तिच्या भाडेतत्वावर असलेल्या संपत्तीवरुन मिळकत होत होती. तिने तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काही लोकांना उधारीच्या स्वरुपात दिली होती. ज्यांना व्यावसाय करण्यासाठी पैशांची गरज असते त्यांना ती मदत करत असे. त्यानुसार, संबंधित व्यक्ती तिला व्याज देत असे.
 
 
 
हसीना पारकर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असल्याची माहितीही अलीशाहने दिली आहे. दाऊदची बहिण असल्याने तिचा मोहल्ल्यातही दरारा होता. त्यामुळे संपत्तीशी निगडीत वादही ते सोडवत होते. दाऊद इब्राहिमच्या १९८६च्या आसपास भारतातून पळून गेला, असेही त्याने सांगितले आहे.
 
 
 
दाऊद इब्राहिमवर संयुक्त राष्ट्रानेही टेरर फंडींगचा आरोप केला आहे. सध्या ईडीने दाऊदच्या कुटूंबियांशी निगडीत संबंधित व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. या व्यवहारांद्वारे टेरर फंडींग जमा केल्याचा आरोप आहे. हवालाद्वारे हे पैसे परदेशात पाठवले जात असल्याचाही संसय ईडीला आहे. याच प्रकरणी ईडीने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटची चौकशी केली होती.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0