अंदमान बेटावर तयार होतंय स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळाचे नवे टर्मिनल : पहा फोटो!

    दिनांक  24-May-2022 17:26:31
|

Savarkar
 
पोर्ट ब्लेअर: अंदमान आणि निकोबार बेटावरील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबतची आश्चर्यकारक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ब्रिटीश राजवटीत वीर विनायक दामोदर सावरकरांना बेटांवर असलेल्या सेल्युलर जेलमध्ये दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
 
 

Savarkar2 
 
विमानतळाला लवकरच नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूक वाढल्यामुळे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पूर्णपणे नवीन टर्मिनलचे काम सुरू केले आहे जे सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून बांधले जाईल. एकूण ४०,८३७ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले नवीन टर्मिनल स्ट्रक्चर पीक अवर्समध्ये १२०० लोकांना आणि वर्षाला सुमारे ४० लाख प्रवासी हाताळण्यास सक्षम असेल. नवीन 'पॅसेंजर टर्मिनल स्ट्रक्चर'चे 'लोअर ग्राउंड', 'हाय ग्राउंड' आणि 'पहिला मजला' हे तीन मजले असतील. खालचा तळमजला 'रिमोट अरायव्हल', 'बस लाउंज' आणि 'सर्व्हिस एरिया' म्हणून काम करेल, तर सर्वात वरचा तळमजला प्रवाशांचे प्रस्थान आणि आगमन प्रवेश म्हणून काम करेल. प्रकल्पाची ८०टक्के पेक्षा जास्त कामे झाली आहेत आणि विकास प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.
 
 
 

Savarkar1 
वीर सावरकर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनामुळे पर्यटन व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल, परिणामी या प्रदेशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. वाढलेल्या प्मुरवास सुलभतेमुळे स्थानिक लोकांसाठी नवीन रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर सुधारित शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवांमध्ये प्रवेश देखील शक्य होईल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.