भारताचे तुकडे करणाऱ्या जिन्नाला भाजप विरोध करणारच – सुनील देवधर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-May-2022
Total Views |
SD 


सुनील देवधर यांच्या नेतृत्वाखाली झाले प्रखर आंदोलन
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारताचे तुकडे करणाऱ्या जिन्नाचे नाव भारतातील स्थानांना देणे हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे भाजप त्या नावाव नेहमीच विरोध करत राहणार, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेश सह-प्रभारी सुनील देवधर यांनी मंगळवारी गुंटूर येथे व्यक्त केली.
 
 
आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील एका चौकातील टॉवरला जिन्ना टॉवर असे नाव देण्यात आले आहे. मात्र, भारताचे दोन तुकडे करणाऱ्या जिन्नाचे नाव भारतातील स्थांनाना देणे हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारने जिन्नाचे नाव काढून त्याऐवजी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, यासाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश भाजयुमोने आंदोलन केले.
 
 
 
 
अतिशय शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनास आंध्र पोलिसांनी अडविले आणि आंदोलनार मोठ्या प्रमाणात लाठीमार करण्यात आला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले. मोर्चामध्ये महिलांची लक्षणीस संख्या असतानाही पोलिसांनी अमानूष लाठीमार केल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाचे तुकडे करणाऱ्या जिन्नाचे नाव देशातील कोणत्याही स्थानास दिल्यास भाजपतर्फे त्याचा तीव्र विरोध केला जाईल, असेही सुनील देवधर यांनी म्हटले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@