डोंबिवलीतील काही भागांत आज आणि उद्या वीजपुरवठा बंद

23 May 2022 15:30:29

power off
 
 
 
 
 
कल्याण : वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड या परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा दि. २३ व २४ मे रोजी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. डोंबिवलीच्या इनकमर एक फिडरवरील टिळकनगर, रामनगर, गणेश मंदीर, केळकर रोड, टिळकनगर फिडरवरील बालभवन, चिपळूणकर रोड, मानपाडा रोड, चित्तरंजन दास रोड, आरपी रोड, टाटा लाईन या भागात सोमवार, दि. २३ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत तर केळकर रोड फिडरवरील केळकर रोड, उसेरकरवाडी, पूजा मधूबन, मानपाडा रोड टॉकीज, केडीएमसी आदी भागांचा सोमवार, दि. २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
 
 
 
रामनगर फिडरवरील रामनगर पोलीस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात मंगळवार, दि. २४ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल. देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार असून महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात आली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0