उत्तर प्रदेशात एटामध्ये दर्ग्यावर बुलडोझर!

20 May 2022 14:13:44
UP Bulldozer
 
 
 
 
लखनौ(वृत्तसंस्था): उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत मुळेशाह दर्ग्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई रविवार दि. 15 मे रोजी करण्यात आली. या कारवाईचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. समाजवादी पक्षाने प्रशासनाच्या या कारवाईला विरोध दर्शवला आहे.
 
 

एटा जिल्ह्याच्या एडीएम प्रशासनाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. दर्गा सुरक्षित ठेवला जाईल, पण त्यावर बांधण्यात आलेल्या खोल्या पाडण्यात आल्या आहेत. लोक या खोलीत राहू लागले होते. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  प्रशासनाच्या या कारवाईला समाजवादी पक्षाने विरोध केला आहे. दिबियापूरचे सपा आमदार प्रदीप यादव म्हणाले, “आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून ७ सदस्यीय शिष्टमंडळाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. या कारवाईला आमचा विरोध आहे. त्याचा तपास अहवाल अखिलेश यादव यांना सादर केला जाणार आहे. तसेच हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जाईलअसे त्यांनी सांगितले. 
 

गुरुवारी भरते जत्रा
याच मुल्ला शाहच्या दर्ग्यावर दर गुरुवारी जत्रा भरते. जत्रेत चादरी आणि अगरबत्त्या विकल्या जात होत्या. येथील काळजीवाहू सोनू कुमार नावाचे व्यक्ती आहेत. हा दर्गा किती जुना आहे, हे आज स्पष्ट नाही. पण काळजीवाहू ते शंभर वर्षे जुने असल्याचे सांगत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0