मुंबई : राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर हे राजकारणात त्यांचा नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिले आहेत.भारतीय लोकशाहीला योगदान देण्यासाठी तसेच लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा माझा प्रयत्न या पुढेही चालूच राहील असेही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली पक्षप्रवेशाची ऑफर आपण नाकारली असून, त्या पक्षाला अशा नेत्याची गरज आहे की जो त्यांच्या पक्षासमोरच्या प्रश्नांशी लढू शकेल आणि पक्षामध्ये परिवर्तन घडवू शकेल असे प्रशांत किशोरांनी सांगितले आहे.