वाराणसी न्यायालयाला ज्ञानवापी प्रकरणात आदेश देण्यास मज्जाव

19 May 2022 13:03:00
 
gyanvapi
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालायने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे. परंतु जो पर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत वाराणसी सत्र न्यायालायाने याबाबत कोणतेही आदेश देऊ नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. वाराणसी सत्र न्यायालयात ज्ञानवापी ढाच्याच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यात मशिदीच्या आवारात हिंदू प्रतीके सापडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
 
ज्ञानवापी ढाच्याच्या आवारातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यावर सत्र न्यायालयाच्या आदेशावरून ती जागा संरक्षित करण्यात आली होती. सत्र न्यायालयाच्या याच आदेशाच्या विरोधात ढाच्याच्या व्यवस्थापन कमिटीने म्हणजे अंजुमन इंतेझामिया कमिटीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणाची सुनावणी आता होणार आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0