मराठी चित्रपटाची स्पर्धा आता बॉलीवूडशी : प्रवीण तरडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |

tarde 
 
मुंबई : “आता स्पर्धा ही मराठीची मराठीपुरती न उरता मराठीची बॉलीवूडशी, दाक्षिणात्य चित्रपटांशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपट तितक्याच ताकदीने दिसणे, खूप महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत केले. चित्रपटातील संवादाबद्दल तरडे म्हणतात की, “माझे चित्रपट मीच लिहू शकतो. कारण, माझे विषय असे असतात, जे मीच लिहू शकतो. मी शेतकरी-वारकरी कुटुंबातून आहे, तर वारी-शेती या गोष्टी माझ्या संवादात ओघाने येतातच आणि जे अनुभवले असते, ते व्यक्त करायला फारसा विचार करावा लागत नाही.”
 
 
 
यावेळी येसाजी कंक यांची भूमिका साकारणारे रमेश परदेशीदेखील उपस्थितीत होते. आपल्या भूमिकेविषयी सांगताना ते म्हणाले की, “आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपटांत येसाजी कंक यांची व्यक्तिरेखा येऊन गेली आहे. परंतु, त्यांचे बलिदान, त्यांच्या कुटुंबाचे योगदान हे आम्ही चित्रपटात दाखवले आहे.” तर बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेराची भूमिका साकारणारे देवेंद्र गायकवाड म्हणाले की, “ही व्यक्तिरेखा प्रत्यक्ष चित्रपटात पाहण्यात मजा आहे.” यावेळी ‘लीड मिडिया’चे विनोद सातवही उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@