उत्तर प्रदेशात नव्या मदरशांना आता कोणतेही अनुदान नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |

yogi aaditynath
 
 
 
 
 
लखनउ : उत्तर प्रदेशात आता नव्या मदरशांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने गेल्या पंचवार्षिकच्या कालावधीतही मदरशांना कोणतेही अनुदान दिले नव्हते. आता मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. इतकेच नव्हे, तर न्यायालयात जाऊनही मदरशांना कसलाही दिलासा मिळणार नाही. या निर्णयातून योगी आदित्यनाथ सरकारने अखिलेश यादवांचे मुस्लीम लांगूलचालनाचे धोरण संपवले आहे. उत्तर प्रदेशात सध्या ५५८ मदरशांना सरकारी अनुदान दिले जाते.
 
 
 
दरम्यान, समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव सरकारने २००३ पर्यंतच्या मान्यताप्राप्त १४६ मदरशांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनुदानप्राप्त मदरशांची संख्या १०० ने वाढवली. तरीही ४६ मदरशांना अनुदान मिळत नव्हते. अनुदान मिळत नसल्याने उरलेल्या ४६ मदरशांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अनुदानप्राप्त मदरशांत एका मदरशाचा समावेशही केला गेला. पण याबरोबरीनेच आता योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाने अखिलेश यादव सरकारचा निर्णय पलटवला. यानंतर उरलेल्या कोणत्याही मदरशाला अनुदान दिले जाणार नाही. सध्या उत्तर प्रदेशात एकूण १६ हजार, ४६१ मदरसे असून त्यातल्या ५५८ मदरशांना सरकारी अनुदान मिळते.
दरम्यान, नुकताच योगी आदित्यनाथ सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य केले आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्याआधी शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींना राष्ट्रगीताचे गायन करावे लागेल.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@