नवजोत सिंह सिद्धू यांना कोर्टाकडून मोठा झटका ; ३४ वर्ष जुन्या प्रकरणात एका वर्षाचा तुरुंगवास

19 May 2022 17:55:29
 
 
Navjot Singh Sidhu Arrested!
 
 
 
 
नवी दिल्ली: पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष.नवजोत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने ३४ वर्ष जुन्या प्रकरणात एका वर्षाची कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. १९८८ साली झालेल्या एका कार पार्किंगच्या वादात, सिद्धू यांच्यावर एका वृद्धाला मारहाण करण्याचे आरोप आहेत. यापूर्वी एकदा त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला होता. परंतु, सिंधू यांच्या विरोधात पीडित पुनर्विचार याचिका दाखल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
 
 
 
काय होता प्रसंग?
२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. त्यावेळेस, ते भारतीय क्रिकेटपटू असताना, त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते. बाजारात कार पार्किंगच्या प्रकरणावरून त्यांचा ६५ वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी वाद झाला व प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. मारहाणीमध्ये, गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त त्यावेळी समोर आले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0