विक्रोळीत ‘हेल्थ कार्ड’ शिबीर संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |

health card 2
 
 
 
 
 
मुंबई : ‘अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन’तर्फे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)चे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन नवकार यांच्या पुढाकाराने टागोरनगर विक्रोळी पूर्व येथे ‘आयुष्यमान भारत प्रकल्पांतर्गत हेल्थ कार्ड (आभा कार्ड) शिबीर संपन्न झाले. शिबिरात सुमारे २५० लोकांनी लाभ घेतला.
 
 
 
“ ‘आभा कार्ड’ हे ‘डिजिटल कार्ड’ असून त्यावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्याने संबंधित व्यक्तीची सर्व वैद्यकीय माहिती त्वरित उपलब्ध होते. भविष्यात आपल्या फॅमिली डॉक्टर, पॅथॉलॉजि व रुग्णालयात कुठेही आपण गेलात, तर ‘आभा कार्ड’ अनिवार्य मागितले जाईल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झालेला हा प्रकल्प अतिशय उपयुक्त आणि संयुक्तिक आहे,” असे मत ‘अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन’चे संस्थापक अश्विन मलिक मेश्राम यांनी व्यक्त केले.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@