राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडशाही विरोधात भाजपचे निषेध आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |

BJP 2
 
 
 
 
 
पुणे : पुणे शहर भाजपच्यावतीने बुधवारी ’अल्का टॉकीज’ चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडशाही विरोधात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, “केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पुणे येथील सभा उधळून लावण्यासाठी राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने गोंधळ घातला तो अत्यंत निषेधार्ह होता.
 
 
 
भाजपच्या कार्यकर्त्यांनी समज देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करूनही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी सत्तेच्या माजात पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले. तसेच, राष्ट्रवादीची ही झुंडशाही भाजप सहन करणार नाही. तोडीस तोड उत्तर देऊ,” असा इशाराही मुळीक यांनी दिला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हे विनयभंगाचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी भाजपने डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन मागणीपर निवेदन दिले.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@