केतकी चितळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2022
Total Views |
 
ketki
 
 
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने कळंबोली येथून अटक केली होती. त्त्यानंतर बुधवारी तिला न्यायालयासमोर दाखल करण्यात आले असताना तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
 
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचा आरोप केतकीवर आहे. न्यायालयात बाजू मांडताना केतकीने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करणे हा गुन्हा आहे का? असा सवाल केला. आपण ती पोस्ट डिलीट करणार नसून तो आपला अधिकार आहे असा युक्तिवाद केतकीने न्यायालयात आपली बाजू मांडताना केला.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@