ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण थांबणार नाही, शिवलिंग सापडलेली जागा ‘सील’ करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2022
Total Views |
 
 
 
 
msjid
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : “ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडलेली जागा ‘सील’ करावी व संपूर्ण सुरक्षा द्यावी,” असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. ज्ञानवापी मशीद प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून वाराणसी न्यायालयात सुनावणी होत आहे. वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते व त्यानुसार सर्वेक्षण झालेही. मात्र, त्याला विरोध करत ‘अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी’ने सर्वेक्षणाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.
 
 
 
  
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात शिवलिंग सापडलेली जागा ‘सील’ करण्याचा आदेश देतानाच मुस्लिमांच्या नमाज पठणात अडथळा यायला नको, असा आदेशही जिल्हा प्रशासनाला दिला. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार, दि. १९ मे रोजी होईल, असेही सांगितले. दरम्यान, मंगळवारच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने आपल्यापुढे सादर करण्यात आलेली याचिका पूजनाचा अधिकार मिळण्यासंदर्भातील असून मालकी हक्कासंदर्भातली नाही, असेही मुस्लीम पक्षाला स्पष्ट केले.
 
 
 
 
 
सर्वेक्षणाच्या स्थगितीला नकार
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देता येणार नाही, असे म्हटले. सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करायला हवी, असे न्यायालयाने याबाबत म्हटले आहे.
 
 
 
‘कोर्ट कमिशनर’ हटवले
 
 
  
दरम्यान, मंगळवारीच वाराणसी सत्र न्यायालयातही ज्ञानवापी मशीद प्रकरणात सुनावणी झाली. सुनावणीवेळी ‘कोर्ट कमिशनर’ने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ मागितला. न्यायालयाने त्याला परवानगी दिली. याचवेळी न्यायालयाने ‘कोर्ट कमिशनर’ अजय मिश्रा यांना हटवण्याचा निर्णय घेतला.
 
 
 
‘सील’ झाल्यानंतरच्या समस्या दूर व्हाव्यात
 
 
वाराणसी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. ‘डीजीसी’ दिवाणी महेंद्र प्रसाद पांडे यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात अर्ज दिला आहे. त्यांनी तीन मागण्या केल्या. पहिली, ज्ञानवापी मशिदीतील ‘सील’ केलेल्या तीन फूट खोल तलावाभोवती पाईपलाईन आणि नळ आहेत. नमाजी वजूसाठी तो नळ वापरतात. तलाव परिसर ‘सील’ केल्यामुळे नमाज पठणासाठी बाहेरच व्यवस्था करण्यात यावी. दुसरी ज्ञानवापीच्या सीलबंद भागातही स्वच्छतागृहे आहेत, ज्याचा वापर नमाजी करतात. आता त्यांना तिथे जाऊ दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. तिसरी ‘सील’ केलेल्या तलावात काही मासेही आहेत. अशा परिस्थितीत त्यांना खाद्य मिळू शकत नाही. ते मासे आता इतर ठिकाणी पाण्यात सोडले पाहिजेत.
 
 
 
काही भिंती पाडून ‘व्हिडिओग्राफी’ व्हावी
 
 
 
पुन्हा एकदा हिंदू पक्षाने ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी मंगळवारी न्यायालयात नवा अर्ज देण्यात आला आहे. ज्ञानवापी परिसराच्या काही भिंती पाडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. रेखा पाठक, मंजू व्यास आणि सीता साहू यांच्यावतीने न्यायालयात हा अर्ज देण्यात आला आहे. यासोबतच ढिगारा साफ करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@