घोडबंदर रोडवर दुभाजकाला धडकुन रसायनाचा टँकर उलटला

18 May 2022 18:22:26
 
 
 
 
accident
 
 
 
 
ठाणे : नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या रसायनांच्या टँकरचा डिझेल टॅंक फुटला. तसेच त्या टॅन्कमधील डिझेलसह गाडीतील रसायन रस्त्यावर सांडल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजजवळ घडली. या घटनेमुळे तब्बल तीन तास घोडबंदर रोडवर वाहतुक खोळंबली.गुजरात अंकलेश्वरहुन रत्नागीरी एमआयडीसी येथे निघालेल्या या टँकरमध्ये दहा टन रसायन होते.
 
 
 
चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.घटनास्थळी कासारवडवली वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने धाव घेत तातडीने टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे तसेच सांडलेल्या डिझेल आणि रसायनावर माती पसरविण्याबरोबर पाण्याचा मारा करण्याचे काम हाती घेतले.यावेळी, दोन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने तो टँकर उचलून बाजूला केला. तर, टँकरला साधारणपणे तीन तासांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात यश आले.सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0