केरळच्या भागात अचानक पाऊस पडण्यामागे अरबी समुद्रातील हालचाली!

18 May 2022 20:19:25
ker
 
 

मुंबई(प्रतिनिधी): तीव्र कमी दाब आणि अरबी समुद्राच्या वातावरणातील अस्थिरतेमुळे पश्चिम किनारपट्टीवर नियमितपणे 'कम्युलोनिम्बस' ढग तयार होत आहेत.  याचा परिणाम केरळ राज्यातील पावसावर होत आहे. 
गेल्या तीन दशकांत अरबी समुद्राचे तापमान चिंताजनक वेगाने वाढत आहे. १९८०च्या दशकात समुद्राचे कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस होते. हे तापमान आता 30 डिग्री सेल्सियसच्या पुढे गेले आहे. तज्ञांनी या घटनेचा संबंध हवामान बदलाशी जोडला आहे. कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चच्या वातावरणशास्त्र विभागाच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे.
समुद्राच्या तापमानवाढीमुळे कम्युलोनिम्बस ढग निर्माण होतात. या ढगांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आणि त्यामुळे केरळसारख्या राज्यात अचानक अनियमित पाऊस पडतो असा निष्कर्ष विभागाने काढला आहे.अरबी समुद्रातील तापमानवाढ जगभरातील इतर समुद्रांच्या तुलनेत सुमारे दीड पट जास्त आहे. असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या तापमान वाढीमुळे पावसाळ्यातही 'क्युम्युलोनिंबस' ढगांची वारंवारिता वाढते, ज्यामुळे राज्यात अतिवृष्टी आणि ढग फुटण्याच्या घटना घडतात. भविष्यातील विकास योजनांचा विचार करताना तीव्र पर्जन्यवृष्टीचा विचार करावा लागेल असे या अभ्यासात म्हंटले आहे.
Powered By Sangraha 9.0