संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2022
Total Views |
 
 
 
sasne
 
 
 
ठाणे : मराठी साहित्य मंडळातर्फे शनिवार २१ मे रोजी दुपारी ३.३० वा. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम येथे होणार आहे.यावेळी ९५ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यकार भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
 
 
तसेच, साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनाही गौरवण्यात येणार आहे.या सोहळ्यानिमित्ताने राज्यस्तरीय काव्यसंमेलनही होणार असुन नामंकित कवींसमवेत नवोदित कवींना कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@