पुणे - नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस ' शिवाई ' धावणार

17 May 2022 19:31:59

Electric Bus
 
 
 
 
 
पुणे : इंधन खर्च कमी करणे आणि पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहने आता रस्त्यावर धावू लागली आहेत, याच उपक्रमाचा भाग म्हणून राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस १ जून पासून धावणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही पहिली बस पुणे - नगर अशी धावेल.इलेक्ट्रिक मोबलिटी सर्व्हिस प्लॅटफॉर्म मार्फत महानगरात ग्रीनसेल मोबैलिटी कडून ही बस महाराष्ट्र रिजनल स्टेट ट्रान्स पोर्ट साठी तयार करण्यात आली असून शिवाई नावाची ही इलेक्ट्रिक बस पुणे येथून नगर साठी रवाना होणार आहे.
 
 
 
एम एस आर सी टी च्या वर्धापन दिनी १ जूनला हा शुभारंभ केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर राज्यात टप्या टप्याने तो राबविला जाणार आहे. राज्यातील विविध शहरात अशा प्रकारच्या ५० शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. या बसेस इंटरसिटी प्रवासासाठी उपलब्ध होतील त्यासाठी राज्यात हरित मार्ग तयार केले जाणार आहेत.
 
 
 
पुणे - संभाजी नगर मार्गावर दहा, पुणे - कोल्हापूर, पुणे - नगर मार्गावर १२ आणि पुणे - नाशिक मार्गावर भविष्यात १८ बस धावतील.पुणे - सोलापूर मार्गावर १० बसेस धावणार आहेत. आम्ही राज्यात सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहोत असे ग्रीन सेल चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक अगरवाल यांनी सांगितले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0