'महाराष्ट्राचे कृषिनायक' ग्रंथाचे शुक्रवारी मुंबईत प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2022
Total Views |
 
 
 
 
 
velinger
 
 
 
 
 
 
मुंबई / पुणे : विवेक प्रकाशित ‘महाराष्ट्राचे कृषिनायक' या ग्रंथाचे प्रकाशन 'कृषी विवेक' व 'पार्क' (पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर) च्यावतीने शुक्रवार, दि.२० मे रोजी सायं. ५ वा. माटुंगा येथील वेलिंगर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँण्ड रिसर्चमध्ये करण्यात येणार आहे.
 
 
 
 
माजी केंद्रीय कृषी आयुक्त, नागपूरमधील 'अ‍ॅग्रोव्हिजन फाउंडेशन'चे सल्लागार व ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त मायी हे ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. 'चेंबर फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँण्ड मिडीयम बिझिनेस'चे (सीएएसएमबी) अध्यक्ष निलेश लेले आणि 'पितांबरी प्रॉडक्टस' चे कार्यकारी संचालक रवींद्र प्रभुदेसाई, इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ. शरयू सावंत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
यावेळी पुण्यातील एमसीडीसीचे संचालक मिलिंद आकरे, सीएएसएमबीचे अ‍ॅडव्हाझर डॉ. प्रकाश कोंडकर, गोफॉरफ्रेशचे संचालक मारूती चापके, रवी आहुजा, चेतन जाधव आणि दै.' मुंबई तरूण भारत'चे प्रबंध संपादक आणि 'पार्क' चे संचालक दिलीप करंबेळकर व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ' महाराष्ट्राचे कृषिनायक' या ग्रंथात १७५ हून अधिक शेतकऱ्यांची यशोगाथा संकलित केली आहे.
 
 
 
RSVP : रसिका गोगटे
 
 
ईमेल आयडी: [email protected]
@@AUTHORINFO_V1@@