'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल' मध्ये जिंतेंद्र जोशी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2022
Total Views |
 
 
 
joshi
 
 
 
प्रतिष्ठित मानल्या जाणऱ्या 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल' (NYIFF)२०२२ साठी जिओ स्टुडीओच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटामधील अभिनेता जितेंद्र जोशी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आनंदाचे वातावरण झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा अभिनास्पद क्षण आहे, आणि त्यामुळे जितेंद्र जोशींवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
 
 
एवढेच नाही तर या चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म म्हणून 'गोदावारी'चीच निवड केली आहे. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, नीना कुळकर्णी , संजय मोने असे दिग्गज कलाकार आहेत. तर निखिल महाजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
 
 
joshi
 
 
 
या चित्रपटात जितेंद्र जोशी यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी गौरी नलावडे हिने आपल्या पोस्ट मधून ही आनंदाची बातमी व्यक्त केली आहे, ''क्षण अभिमानाचा! New York Indian Film Festival 2022 मध्ये 'गोदावरी'साठी जितेंद्र जोशीला 'उत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार !'' शिवाय IFFI मध्ये मानाचा Silver Peacock पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनयाच्या या दुसऱ्या पुरस्कारासाठी जितेंद्र जोशीचे हार्दिक अभिनंदन! असेही तिने लिहिले आहे , 'Our very own Jitendra Joshi wins the Best Actor award at NYIFF for GODAVARI. This is the second acting award for Jitendra after he won the prestigious Silver Peacock at the International Competition at IFFI. '
@@AUTHORINFO_V1@@