'सरसेनापती हंबीरराव' २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2022
Total Views |
 
 
chitrapat
 
 
 
२७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातील 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' हे वाक्य चांगलेच गाजत आहे. आजच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेक चित्रपटांमधून अभिनेता म्हणून तर सध्या विशेष चर्चेत असलेल्या ‘धर्मवीर- मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटामुळे दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांच्या पसंतीस पडलेले प्रवीण तरडे यांना स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत. त्याच बरोबर अनेकांना हंबीरराव मोहिते नेमके कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य सेनेचे ते सरसेनापती कसे बनले, त्यांचं कार्य काय याची उत्सुकता लागली आहे. चित्रपटात गश्मीर महाजनी, राकेश बापट, मोहन जोशी यांना ऐतिहासिक भूमिकेत बघायला चाहते उत्सुक आहेत.
@@AUTHORINFO_V1@@