"भरला तुझा पाप घडा नाहीतर होईल राडा" : केतकी चितळे

    दिनांक  14-May-2022 13:54:08
|

Sharad Pawarमुंबई :
"तुका म्हणे पवारा..., अशा शेलक्या शब्दांत केतकी चितळेने शरद पवारांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शरद पवारांवर टीका करताना केतकी चितळेने अॅड. नितीन भावे यांचा ओळींचा दाखला दिला आहे. पवारांचा अवमान केल्या प्रकरणी तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी काहींनी तिचं समर्थन केलंयं तर काहींनी तिच्या या पोस्टवरुन ट्रोल केले आहे. राष्ट्रवादीतर्फे केतकीच्या पोस्टविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी यावरुनही भाजपला निशाणा केले आहे. केतकीच्या फेसबूक पोस्टवर हजारो कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तर चारशेहून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. पवारांनी काही दिवसांपूर्वीच जवाहर राठोड यांच्या 'डोंगराचे ढोल' या कवितासंग्रहातील 'पाथरवट' ही कविता चुकीच्या पद्धतीने म्हटली होती. त्याच स्वतःची वाक्य घालून कवीच्या नावावर खपविल्याने पवारांवरही जोरदार टीका झाली होती.


Pawar

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.