‘विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी’ विशेषांकानिमित्त व्याख्यानमाले’चे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2022
Total Views |
 vichar
 
 
 
मुंबई : संघविचारांची कालानुरूप मांडणी करत त्यास कृतीची जोड देणार्‍या, हिंदुत्व आणि राष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांवर साप्ताहिक ‘विवेक’द्वारा ’विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी’ या विशेषांकाचे येत्या २१ जून रोजी प्रकाशन होत आहे. यानिमित्त सा. ‘विवेक’ने ’विचारजागरण व्याख्यानमाला’ या तीनदिवसीय ऑनलाईन कार्यक्रमाचे दि. १६ मे ते १८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजन केले आहे.
 
 
 
केंद्रीय घुमंतु जाती आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा इदाते, भारतीय मजदूर संघ - महाराष्ट्र अध्यक्ष अनिल ढुमणे, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक व विचारवंत रमेश पतंगे अशा अनेक मान्यवरांची व्याख्याने या तीन दिवसीय व्याख्यानमालेत होणार आहेत. सा. ‘विवेक’च्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवरून ही व्याख्यानमाला प्रेक्षकांना पाहता येईल.
सा. ‘विवेक’च्या ’विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी’ या विशेषांकाची अधिकाधिक नोंदणी आपल्या विचार परिवारातील कार्यकर्ते, वाचक, हितचिंतक व सर्वच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी करावी, असे आवाहन सा.‘विवेक’तर्फे करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@