नवाब मालिकांचा जामीन नाहीच - सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला

    दिनांक  13-May-2022 12:32:22
|
 
nawab
 
 
 
मुंबई : मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला आहे. वैद्यकीय कारणांसाठी त्यांनी जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली होती पण न्यायालयाने ही याचिकाही फेटाळून लावली आहे, मात्र नवाब मालिकांना खासगी रुग्णालयातून उपचार करून घेण्यास मात्र नायालयाने परवानगी दिली आहे.
 
 
 
ही परवानगी मिळाल्यावर नवाब मलिक कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल होणार आहेत. या उपचारांसह त्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्तचाही खर्च नवाब मालिकांनाच करावा लागणार आहे असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.