काश्मिरी पंडित राहुल भट्टची दहशतवाद्यांतर्फे हत्या

13 May 2022 16:11:26
 
rahul
 
 
 
 
 
 
श्रीनगर : बुडगावात महसूल खात्यात काम करणाऱ्या राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची गुरुवारी दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जम्मू खोऱ्यातील बुडगाव येथे राहूल आपल्या कुटुंबासोंबत राहत होता. या हत्येनंतर तीव्र जनक्षोभ उसळला असून पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. काश्मीर खोऱ्यात पुनः एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात आसल्याचे यातून उघड झाले आहे.
  
 
 
 
मार्च महिन्यापासून काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या हत्यांच्या घटना वाढल्या आहेत. लष्कर-ए-तोयबशी संबंधित एक दहशतवादी गटाकडून  काश्मिरी पंडितांची हत्या केल्या जात आहेत अशी पोलिसांची प्रतिक्रिया आहे. राहुल भट्टला असेच लक्ष्य केले गेले. दहशतवाद्यांकडून राहुलवर तीन गोळ्या झाडल्या गेल्या त्यातील दोन त्याच्या छातीत लागल्या, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.
 
 
 
 
या घटनेनंतर प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. संतप्त लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढला. राहुलच्या हत्येची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी राहुलच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर यांसारख्या घटनांमधून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
 
 
 
 
दहशतवाद्यांकडून आता पोलीसही लक्ष्य 
 
 
 
काश्मिरी पंडित आणि महसूल विभागाचे कर्मचारी राहुल भट यांची हत्या केल्यानंतर, शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे रियाझ अहमद ठोकर असे नाव आहे. गुडुरा येथे ते त्यांचा राहत्या घरी होते. या हल्ल्यात ते प्रचंड जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.या एकापाठोपाठ होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, काश्मिरी पंडित अमित म्हणतात, "एलजी प्रशासनाने आम्हाला सुरक्षा पुरवावी, अन्यथा आम्ही आमच्या संबंधित पदांचा सामूहिक राजीनामा देऊ."
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0