केदारनाथ मध्ये VIP प्रवेश बंद

    दिनांक  13-May-2022 16:52:36
|
 
 
 
 
kedarnath
 
 
 
उत्तराखंड : कोरोना काळात बंद झालेले केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुले करताच भाविकांची प्रचंड गर्दी सुरु झाली. गेल्या ६ दिवसात १ लाख ३० हजार भक्तांनी हजेरी लावली. या वाढत्या गर्दीचा ओघ कमी करण्यासाठी प्रशासनाने VIP प्रवेश बंद केला आहे. डीजीपीनी सांगितल्याप्रमाणे, आता VIP ना सुद्धा सर्वसामान्यांप्रमाणे भेट द्यावी लागेल, व त्यासाठी २ तास दिले जातील.
 
 
उत्तराखंडचे मुख्यमंत्री, पुष्कर धामी यांनी, आरोग्य संबंधी काही समस्या असल्यास केदारनाथ ला भेट न देण्याचे आवाहन केले आहे. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी लक्षात घेऊन ITBP आणि NDRF च्या टीम मंदिरात तैनात करण्यात आल्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.