पीएफआयच्या दोन नेत्यांना होणार अटक?

13 May 2022 18:56:27
 pfi
 
नवी दिल्ली (प्रतिनिधी): सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या दोन नेत्यांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए)च्या तरतुदींखाली माननीय विशेष पीएमएलए न्यायालय, लखनौसमोर तक्रार दाखल केली आहे. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी ईडी प्रयत्नशील आहे.
 
मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची दखल न्यायालयाने घेतली आहे.तत्पूर्वी, ६ फेब्रुवारी रोजी (पीएफआय) आणि त्यांची विद्यार्थी शाखा 'कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया'च्या पाच सदस्यांच्या विरोधात फिर्यादी तक्रार दाखल केली होती. पीएफआय आणि त्याच्या संबंधित संस्थांचे सदस्य अब्दुल रझाक बीपी ही आखाती देशांमध्ये अशा संघटनांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रमुख व्यक्ती होती. भारत आणि परदेशात निधी उभारण्यात/संकलन करण्यात त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून त्याने सुमारे भूमिगत/अवैध वाहिन्यांद्वारे भारतात १९ कोटी रुपये लाटल्याचा आरोप आहे. दोन महिन्यांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने केरळच्या कोझिकोड विमानतळावर अब्दुल रझाकला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात "देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना" पकडले होते.
Powered By Sangraha 9.0