काश्मीरमध्ये १५ तासात दुसरी हत्या

    दिनांक  13-May-2022 17:53:59
|
 
 
 
 
 
bullet
 
 
 
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये १५ तासांत दहशतवाद्यांनी दुसरी घटना घडवली आहे. गुरुवारी (१२ मे २०२२)  काश्मिरी पंडित आणि महसूल विभागाचे कर्मचारी राहुल भट यांची हत्या केल्यानंतर, शुक्रवारी (१३ मे २०२२) सकाळी दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून गोळ्या झाडल्या. जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे रियाझ अहमद ठोकर असे नाव आहे. गुडुरा येथे ते त्यांचा राहत्या घरी होते. या हल्ल्यात ते प्रचंड जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
 
 
या एकापाठोपाठ होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी  सुरक्षा दलांनी ऑपरेशन सुरू केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, काश्मिरी पंडित अमित म्हणतात, "एलजी प्रशासनाने आम्हाला सुरक्षा पुरवावी, अन्यथा आम्ही आमच्या संबंधित पदांचा सामूहिक राजीनामा देऊ."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.