राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

13 May 2022 19:15:39
 
 
page 1
 
 
 
 
नवी दिल्ली : देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार असतील. राजीव कुमार १५ मे रोजी पदभार स्वीकारतील. राजीव कुमार यांच्या नियुक्तीबाबत कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे.
राजीव कुमार यांना १ सप्टेंबर २०२० रोजी निवडणूक आयुक्त बनवण्यात आले. निवडणूक आयोगाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी राजीव कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (पीएसबी) अध्यक्ष होते. त्यांनी एप्रिल २०२० मध्ये पीइएसबीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. राजीव कुमार हे १९८४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील बिहार/झारखंड केडरचे अधिकारी आहेत. ते फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले होते.
राजीव कुमार, संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड इकॉनॉमिक इंटेलिजन्स कौन्सिल (इआयसी), वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद (एफएसडीसी), बँक बोर्ड ब्युरो (बीबीबी), वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती (एफएसआरएएससी) आणि इतर अनेक मंडळे आणि समित्या तसेच नागरी सेवा मंडळाचे देखील सदस्य आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0