डी-गँगविरोधात एनआयएनं कारवाईचा फास आवळला!

बॉलीवुडमधून खंडणी उकळणाऱ्या आरीफ अबूबकर शेख आणि शब्बीर शेख

    दिनांक  13-May-2022 18:27:03
|
NIA

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाईचा फास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएनं आवळण्यास सुरुवात केली आहे. दाऊदशी संबंधित दोन व्यक्तींना टेरर फंडींगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीयं. आरीफ अबूबकर शेख आणि शब्बीर शेख अशी या दोघांची नावं आहेत. त्यांना कोर्टाने २० मे पर्यंत कोठडी सुनावणी केली आहे. बॉलीवुडमध्ये बड्या कलाकारांना धमकावून खंडणी गोळा करण्याचं काम करत होते.


NIA कडे त्या संदर्भात ठोस पुरावे सापडले आहेत. या दोघांच्याही संपर्कात छोटा शकील होता. त्यामुळे शकील विरोधात इंटरपोलतर्फे रेड नोटीस जाहीर करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव दोघांचीही व्यवस्था गोपनीय ठिकाणी करण्यात आली आहे. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई बाहेरुन खंडणी, ड्रग्ज आणि दहशतवाद पसरविण्याचे काम करत आहे.
याच संशयावरुन एनआयएची कार्यवाही सुरू आहे. नवी दिल्ली, मुंबईसह देशातील इतर ठिकाणी हिंसाचार भडकविल्याच्या प्रकरणांचा आणि टेरर फंडींगचा काही संबंध आहे का याचा तपास एनआयए करत आहे. याच संदर्भात ९ मे रोजी मुंबईतील २४ ठिकाणी आणि मीरा-भाईंदरच्या पाच ठिकाणांची चौकशी करण्यात आली. याच प्रकरणात दाऊदची बहिण हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊदचा सहकाही छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटलाही ताब्यात घेण्यात आलंयं.


त्याच्याशिवाय अन्य २० जणांविरोधातही चौकशी सुरू आहे. UAPA अंतर्गत दाऊदचा छोटा भाऊ इकबाल कासकरच्या चौकशीतूनही काही माहिती उघड झाली आहे. एनआयएच्या रडारवर आता दाऊद आणि त्याच्याशी निगडीत लश्कर-ए-तोयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अल कायदा (AQ) सह आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी निगडीत लोक आहेत


दाऊद मुंबईत सातत्याने मुंबईत फंड गोळा करण्याचं काम करत आहे, असा संशय एनआयएला आहे. दाऊद आपलं आंतरराष्ट्रीय नेटवर्क वापरुन हाजी अनीस, छोटा शकील, जावेद पटेल आणि टाइगर मेमनशी निगडीत हस्तकांना वापरुन मुंबईत टेरर फंड गोळा करण्याचं काम करत असल्याचा दावा एनआयएनं केला आहे. दहशतवादी संघटनांतर्फे केली जाणारी हत्यारांची तस्करी, नार्को दहशतवाद, मनी लाँण्ड्रींग, बनावट नोटा आणि टेरर फंडींग आदी प्रकरणांवर एनआयए लक्ष ठेवून आहे.

निधी गोळा करण्यासाठी दाऊदशी संलग्न मुंबईतील प्रमुख संपत्तींचा वापर केला जात असल्याचा संशय एनआयएला असून त्या संदर्भातील चौकशी सध्या सुरू आहे. याच चौकशीत एनआयएच्या हाती महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत. एनआयएच्या दाव्यानुसार, सोमवारी ९ मे रोजी अशाच संशयित ठिकाणांवर एनयआयएनं धाडी टाकल्या आहेत. यात काही इलेक्ट्रोनिक उपकरणे आणि दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.

इकबाल कासकरच्या कोठडीची मागणी
मुंबईतील विशेष न्यायालयात एनआयएनं इकबाल कासकरच्या कोठडीची मागणी केली आहे. एनआयएनं न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, डी-कंपनीने स्फोटकांद्वारे राजकीय नेते, व्यापारी आणि अन्य प्रतिष्ठीत व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना आखली होती. या प्रकारे दिल्लीसह देशभरात दंगलीसदृश्य परिस्थिती उद्भवेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा कट दहशतवाद्यांचा होता.मंत्री नवाब मलिकांवरही झाली होती कारवाई!


यापूर्वी ईडीने नवाब मलिकांच्या दाऊद गँगशी संबंधित व्यवहारांमुळे त्यांच्यासह कुटूंबीयांच्या नियंत्रणात असलेल्या सॉलिडस इनवेस्टमेंट्सवर कारवाई करण्यात आली. यात मुनीरा प्लंबरची संपत्ती खरेदी केल्याचे आढळले आहे. ईडीने केलेल्या आरोपांनुसार हसीना पारकर आणि नवाब मलिकांनी याविरोधात पुरावे सादर केले आहेत. भारतने UAPA अंतर्गत इब्राहिम आणि शकीलला दहशतवादी घोषित केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.