केजरीवाल यांचे सहकारी आमदार अमानतुल्लाह खान ‘बॅड कॅरेक्टर’ म्हणून घोषित

दिल्ली पोलिसांची कारवाई

    दिनांक  13-May-2022 19:29:21
|
 bad c
 
 
 
 
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी): अतिक्रमणविरोधी मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांना दिल्ली पोलिसांनी 'सराईत गुन्हेगार' म्हणून घोषित केले आहे. तशी विनंती जामिया नगर पोलिस स्थानकाच्या एसएचओ यांनी दक्षिण – पूर्व दिल्लीच्या पोलिस उपायुक्त ईशा पांडे यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रस्तावास मंजुरी मिळताच अमानतुल्लाह खान यांना 'वाईट चारित्र्या'चा म्हणजेच 'बॅड कॅरेक्टर' असे घोषित करण्यात आले आहे.
 
जामिया नगर पोलिस स्थानकाच्या एसएचओतर्फे अमानतुल्लाह खान यांच्याविरोधात पोलिस उपायुक्तांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यात अमानतुल्लाह खान हा सराईत गुन्हेगार असल्याचे नमूद करून त्याच्यावर पोलिसांची देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमानतुल्लाह खान यांना बॅड कॅरेक्टर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात जमिन बळकावण्यासह विविध १८ गुन्हे दाखल आहेत. शाहीनबाग येथे दिल्ली महानगरपालिकेतर्फे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेसही अमानतुल्लाह खान यांनी विरोध करून स्थानिकांना भडकविले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.