ओबीसी आरक्षणासाठी गठित समर्पित आयोगाकडे २५ मे रोजी कोकण भवनमध्ये दाद -फिर्याद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2022
Total Views |
obc 
ठाणे (प्रतिनिधी): नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी) आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी गठित समर्पित आयोगाने विभागनिहाय भेटीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हा आयोग बुधवार, दि.२५ मे रोजी कोकण विभागीय कार्यालयात दु.२:३० ते ४:३० या वेळेत भेट देणार असून यावेळी नागरिकांना निवेदने देता येतील. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत, यासाठी भेटीच्या दिनांकापूर्वी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.
 
 
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजेएनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी हा समर्पित आयोग विभागनिहाय भेटी देणार आहे. त्यानुसार, कोंकण विभागात दि.२५ मे रोजी आयोगाचा दौरा होणार आहे
@@AUTHORINFO_V1@@