भाजपचे पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2022
Total Views |

bjp 
 
 
 
उल्हासनगर : राज्य शासन तसेच मनपा प्रशासन धोखादायक इमारती संदर्भात कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने त्याचा निषेध म्हणून उल्हासनगर मनपा मुख्यालयासमोर भाजप तर्फे आंदोलन काल करण्यात आले. यात खासदार किरीट सोमय्या सहभागी झाले होते.
 
 
मी उल्हासनगर मध्ये येणार आहे असे ट्विट केल्यानंतर मला उल्हासनगर मध्ये येऊन दाखव अशी धमकी देण्यात आली होती, धमकी देणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी २४ तासांत अटक करावी नाहीतर मी माझ्या परीने उत्तर देईल असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिले आहे .
 
 
उल्हासनगर मधील धोकादायक इमारतींमधून विस्थापित झालेल्या राहिवाश्यांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपचे मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात किरीट सोमय्या सामील झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना हे आव्हान केले .
 
 
पोलिस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चालते का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. उल्हासनगर मध्ये अनेक इमारती कोसळून कित्येक जणांना जीव गमवावा लागला, तसेच धोकादायक इमारतींमुळे विस्थापित झालेल्या हजारो नागरिकांचे त्वरित पुनर्वसन मनपा प्रशासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करावे, केवळ घरांच्या नावावर भ्रष्टाचार राज्यसरकारने करू नये, उल्हासनगर मध्ये कोव्हिड रुग्णालयाच्या नावाखाली ४ करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला , मुंबईत देखील कोव्हिडं रुग्णालयाचा कंत्राट हा शिवसेनेच्या नेत्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला आहे या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सोमय्या यांनी केली .
 
 
शहरातील आतापर्यंत १५ पेक्षा जास्त इमारती कोसळून २० जणांना प्राण गमवावे लागले आहेत , मृतांच्या नातेवाईकांना मनपाकडून व राज्यसरकारकडून ५ लाखांची आर्थिक मदत मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करून सुद्धा त्याची अमंलबजावणी करण्यात आली नाही.
 
 
या आंदोलनात भाजप आमदार कुमार आयलानी, शहर अध्यक्ष जमनु पुरुसवानी, माजी नगसरसेवक नरेंद्र राजानी, प्रदीप रामचंदानी, राजेश वधारिया , लाल पंजाबी, मनोहर खेमचंदानी, अमित वाधवा, मनोज साधनानी, प्रकाश तलरेजा, माजी महापौर मीना आयलानी, मंगला चांडा आदी उपस्थित होते .
@@AUTHORINFO_V1@@