ऊर्जामंत्र्यांच्या मुलाचा पेज ३ धांगडधिंगा - विक्रांत पाटील

12 May 2022 12:55:38
 
kunal
 
 
 
 
 
मुंबई: ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी शिबिराच्या नावाखाली पेज ३ धांगडधिंगा पार्टी आयोजित करून त्यात अनेक गोष्टी घडल्याचा आरोप भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. ऊर्जा खात्यातील कंत्राटदारांची पिळवणूक करून भ्रष्टाचारी मार्गाने हा पैसा मिळवला का? असा सवाल विक्रांत पाटील यांनी केला आहे. या प्रकारणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
 
कुणाल यांनी करोडो रुपये खर्चून अध्यक्षपद मिळवले, त्यातून करोडो रुपये खर्चून स्वतःचा पदग्रहण सोहळा आयोजित केला हा सर्व पैसा आणला कुठून? . वडिलांनी आधीच ऊर्जा खात्याच्या पैश्यातून स्वतःसाठी उधळपट्टी केली आता मुलगाही त्याच मार्गाने पैसा मिळवतोय का? याची सखोल चौकशी करा अशी मागणी विक्रांत यांनी केली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0