मुख्यमंत्र्यांच्या टोमणा सभेला अटी- शर्ती नाहीत का? - गजानन काळे

    दिनांक  12-May-2022 14:41:46
|
 
 
gajanan
 
 
 
 
 
मुंबई : "राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्यावेळी अटी - शर्ती घातल्या होत्या मग आता मुख्यमंत्र्यांच्या टोमणा सभेला काही अटी- शर्ती आहेत का ?" असा सवाल मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या वेळी घातलेल्या अटींचा भंग झाला म्हणून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हाच न्याय मुख्यमंत्र्यांनाही लावणार का ? असा सवाल गजानन काळे यांनी केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
आमचे सरकार आले की मशिदींवरील भोंगे बंद करणार अशी घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती आता बाळासाहेबांचे ते स्वप्न पूर्ण करण्याचे धैर्य हिंदुत्वाचा कैवार घेतलेली शिवसेना दाखवणार का? असा सवाल सुद्धा गजानन काळे यांनी विचारला आहे. १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.