...तर मंदिरेच उभी राहतील!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022
Total Views |
 
 
Mehbooba Mufti
 
 
 
 
 
मेहबूबा मुफ्ती वा त्यांच्यासारख्या सर्वच धर्मांध मुस्लिमांनी शांतपणे हिंदूंची मागणी मान्य करावी. हिंदू निवडक मशिदींवरील मंदिरांची मागणी करताहेत तर ती द्यावीत. हिंदूंनी इतकी वर्षे सहिष्णुता दाखवली, आता ती सहिष्णुता मुस्लिमांनीही दाखवावी.
 
 
“हिंमत असेल तर ताजमहाल आणि लाल किल्ल्याचे मंदिरात रुपांतर करून दाखवा, मग पाहू ते पाहायला कोण येतेय,” असा इशारा ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’च्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मोदींना दिला. त्याला आता चर्चेत आलेल्या काशिविश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशिदीशी संबंधित न्यायालयीन खटल्याची पार्श्वभूमी आहे. मात्र, मेहबूबा मुफ्तींनी अशीच धमकी जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ हटवण्याआधीही दिली होती. विशेष दर्जा देणारी कलमे हटवली, तर जम्मू-काश्मीर भारतापासून फुटून निघेल इथपासून ते जो कोणी जम्मू-काश्मीरला लागू असलेली कलमे हटवण्याचा प्रयत्न करेल, त्याचे हात कलम करू, अशी धमकी मेहबूबा मुफ्तींनी दिली होती. अर्थात, त्या धमकीचा काहीही परिणाम झाला नाही आणि जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ मेहबूबा मुफ्ती, फारुख व ओमर अब्दुल्लांच्या नाकावर टिच्चून हटवले गेले.
 
 
स्थानिक जनतेनेही मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचे, विकासाचे नवे युग सुरू झाले.त्याचा मुफ्ती आणि अब्दुल्ला या दोन्ही कुटुंबांना त्रास होणे साहिजकच. स्वातंत्र्यापासून ७० वर्षे मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्यानेच जम्मू-काश्मीरची सत्ता उपभोगली आणि सर्वसामान्य जनतेला ओरबाडण्याचे काम केले. स्वतःची घरे भरताना जम्मू-काश्मीरच्या जनतेला मात्र साध्या साध्या सोई-सुविधांपासूनही वंचित ठेवले. त्याचीच ठसठस मेहबूबा मुफ्तींच्या बोलण्यातून गेल्या तीन वर्षांपासून सतत बाहेर पडत असते. आता त्यांनी ताजमहाल आणि लाल किल्ल्याबाबत इशारा दिला. जेणेकरून मुस्लीम जनमत आपल्यामागे उभे राहील. पण, आज ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा न्यायालयात आहे, त्याच्या व्हिडिओग्राफीचे आदेश दिलेले आहेत, त्यातून सत्य काय ते बाहेर येईल आणि हिंदूंच्या बाजूने तथ्य असतील, तर तिथेही मंदिरच उभे राहील. मेहबूबा मुफ्ती वा त्यांच्यासारख्या कितीही धर्मांधांना विरोधाची फडफड केली तरी त्यांना आडवे पाडण्याचे काम न्यायालयीन निकालातूनच होईल. 
 
 
आता भाजपचे अयोध्येतील माध्यम प्रभारी रजनीश सिंह यांनी ताजमहालाच्या २२ बंद खोल्यांचे दार उघडण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयानेही याचिकेवर सुनावणीची तयारी दाखवली असून, या प्रकरणाचीही न्यायालयीन प्रक्रियेची पुढची वाटचाल सुरू होईल. त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, तो निकाल मुस्लीम पक्षाच्या बाजूने असेल किंवा हिंदू पक्षाच्या बाजूने. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. अशा परिस्थितीत त्याला आतापासूनच विरोध केला जात असेल आणि मंदिर बांधून दाखवण्याचे इशारे दिले जात असतील, तर त्यातून दोन गोष्टी दिसतात.
 
 
 
 
 एक तर ताजमहाल हिंदू मंदिरच असून त्याची माहिती मेहबूबा मुफ्तीसारख्यांना आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून आतापासूनच बोंबाबोंब सुरू झाली आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मेहबूबा मुफ्तींचा न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास नाही. त्यांना ताजमहालाबाबतही मुस्लीम वर्चस्वाचाच कायदा चालवायचा आहे. ‘आम्ही म्हणू ते हिंदूंनी मुकाट्याने मान्य करायलाच हवे, कारण आमचे पूर्वज इथले राज्यकर्ते म्हणजे मुघल होते. आम्ही त्या तथाकथित विजेत्यांचे वंशज आहोत आणि हिंदूंसारख्या जितांना आमच्या मनमर्जीप्रमाणे वागवणे आमचे काम आहे,’ ही ती मानसिकता आहे. पण, आता देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने चालतो, मेहबूबा मुफ्तींच्या मुघली कायद्याने नव्हे. तेव्हा त्यांनी हिंदूंना धमक्या, इशारे देणे बंद करावे, त्यातून साध्य काहीच होणार नाही.
 
 
 
उलट ९० च्या दशकात अयोध्येचा मुद्दा पुढे आला आणि आता श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिराची निर्मिती सुरु आहे. ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीतही तसेच होईल, मथुरेतील शाही ईदगाहच्या बाबतही तसेच होईल, दिल्लीतील कुतुबमिनारबाबतही तसेच होईल आणि ताजमहाल, लाल किल्ल्याबाबतही तसेच होईल. तिथेही न्यायालयीन निकाल हिंदूंच्या बाजूने आला, तर मंदिरेच उभी राहतील. इतकेच नव्हे, तर सीताराम गोयल यांचे हिंदू टेम्पल्स: ‘व्हॉट हॅपन्ड टू देम’ नावाचे अप्रतिम पुस्तक आहे. त्याच्या पहिल्या भागात हिंदूंना जाचणार्‍या दोन हजार मशिदींची यादी दिलेली आहे, त्या सर्वांची उभारणी हिंदू मंदिरांच्या थडग्यावर झाल्याचे अनेकानेक संदर्भ सीताराम गोयल यांनी दिलेले आहेत. मेहबूबा मुफ्तींनी ते पुस्तकही वाचावे, आज हिंदू धर्मीय मशिदींवरील निवडक मंदिरांची मागणी करताहेत, त्याला मेहबूबा मुफ्तींनी विरोधाचा उद्योग करू नये. अन्यथा हिंदूधर्मीय उद्या मशिदींवर उभारलेल्या हजारो मंदिरांचीही मागणी करतील, तेव्हा मेहबूबा मुफ्ती काय करतील? तसे होऊ द्यायचे नसेल, तर मेहबूबा मुफ्ती वा त्यांच्यासारख्या सर्वच धर्मांध मुस्लिमांनी शांतपणे हिंदूंची मागणी मान्य करावी. हिंदू निवडक मशिदींवरील मंदिरांची मागणी करताहेत तर ती द्यावीत. हिंदूंनी इतकी वर्षे सहिष्णुता दाखवली, आता ती सहिष्णुता मुस्लिमांनीही दाखवावी.
 
 
 
मंदिरे उभारल्यास त्यांना पाहायला कोण येईल, असेही मेहबूबा मुफ्ती आपल्या विधानात पुढे म्हणाल्या. त्यांनी देशातील मंदिरांची यादी व तिथे येणार्‍या भक्तांची, पर्यटकांची संख्या पाहावी. तिरुमला तिरुपती मंदिरात दररोज ७५ हजार भाविक येतात, तर हिमालय पर्वतरागांतील दुर्गमस्थळी वसलेली केदारनाथ धाममध्ये चालू महिन्यात कवाडे उघडल्यानंतर चारच दिवसांत ७५ हजार भक्तांनी दर्शन घेतले. याव्यतिरिक्त अक्षरधाम मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर, मीनाक्षीपुरम मंदिर, काशिविश्वनाथ मंदिर आणि इतरही कितीतरी मंदिरांत दररोज हजारोंच्या संख्येत भाविक, पर्यटक येत असतात. त्यातल्या अनेक मंदिरांचे सौंदर्य, कोरीव काम, शिल्पकला ताजमहालापेक्षाही उजवी आहे, तसेच भव्य दिव्य मंदिर अयोध्येतही उभे राहील आणि न्यायालयीन लढ्यात हिंदूंच्या बाजूने निकाल लागल्यास बांधली जाणारी मंदिरेही सर्वोत्कृष्टच असतील. तिथे भारतच नव्हे, तर परदेशातूनही पर्यटक येतीलच, त्याची चिंता मेहबूबांनी करू नये, त्यांनी आपल्या फसत चाललेल्या राजकारणाची काळजी करावी.
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@