इम्तियाज जलीलकडून औरंगजेबचा महापुरुष म्हणून उल्लेख!

12 May 2022 18:48:16

imtiaz jaleel 
 
 
 
औरंगाबाद : "खुलदाबादमध्ये अनेक महापुरुषांच्या दर्गा आहेत. त्याचप्रमाणे औरंगजेबाचीही आहे. इथे कोणीही आलं तरी ते औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घ्यायला अवश्य जातात. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही.", असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे. एमआयएम तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी (दि. १२ मे) खुलदाबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कंबरीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
 
 
 
खुलदाबादच्या दर्गांना मोठा इतिहास
"खुलदाबादला औरंगजेबाच्या कबरीव्यतिरिक्त इतरही खूप मोठ्या मोठ्या दर्गा आहेत. त्यांना एक विशिष्ट असा मोठा इतिहास आहे. म्हणून एका दर्ग्यात जायचं दुसऱ्या दर्ग्यात नाही जायचं, असं नाही करता येऊ शकत. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही.", असे जलील यांचे म्हणणे आहे.
 
 
 
सगळ्या रंगांप्रमाणे भगवाही आमचा
"काहीना असं वाटतंय की भागव्या रंगावर फक्त त्यांचीच मक्तेदारी आहे. हिरवा हा आमचा रंग आहे, निळाही आमचा रंग आहे. त्यामुळे या सगळ्या रंगांप्रमाणे आता भगवाही आमचाच रंग आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0