२१ व्या शतकातील टॉप फिल्म - केजीएफ२

    दिनांक  11-May-2022 19:00:39
|
 
 
केजीएफ
 
 
 
KGF चॅप्टर २ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. फक्त २६ दिवसांत ह्या चित्रपटाने १०००कोटी रुपये कमावले आहेत. आणि आत्तापर्यंत सुमारे ५ करोडपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट प्रेक्षागृहात जाऊन पाहिला आहे. ह्या पूर्वी प्रेक्षकांनी फक्त गदर, बाहुबली : द कन्क्लूजन या चित्रपटांनाच  एवढा प्रतिसाद दिला होता.


इतर सूत्रांकडून समजते की , निव्वळ २६ दिवसांमध्ये या चित्रपटाने जगभरातून ११६० कोटी रुपये कमावले आहेत. पुढील काही दिवसांत आणखी ३५ ते ४०लाख प्रेक्षक हा सिनेमा बघतील असा अंदाज आहे.सध्यातरी ह्या चित्रपटाने उत्तर भागातून २.३५ करोड, दक्षिणभागातून २.७० करोड, आंध्र प्रदेश -तेलंगणामधून ८५ लाख, कर्नाटक- तामिळनाडूमधून ७०-७० लाख तर केरळ भागातून ४५ लाख प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितल्याचे सर्वेक्षणात समजत आहे.
 
 
२१व्या शतकात केजीएफ-२ या चित्रपटाआधी या चित्रपटास सर्वाधिक पसंती मिळाली तो बाहुबली-२ हा चित्रपट, अंदाजे १०.८० कोटी प्रेक्षकांनी बघितला होता, तर गदर हा चित्रपट ८ ते ९ कोटी प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात जाऊन पहिला होता.
 
 
केजीएफ चित्रपटाचे चाहते भाग १ आणि २ पाहून झाल्यावर केजीएफ ३ ची देखील आत्तापासूनच वाट पाहत आहेत, असे या चित्रपटाचा अभिनेता यश याने सांगितले आहे. तर निर्माते विजय किरगंदूर आता भाग ३ बनविण्याच्या तयारीत आहेत. केजीएफ च्या तिसऱ्या भागात अधिक अॅक्शन प्रेक्षकांस पहावयास मिळणार आहे , हा चित्रपट अधिक रोमांचकारी होणार आहे असेही यश सांगतो.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.