"सभा शिवसेनेची आणि गर्दी मनसेच्या सभेची!"

11 May 2022 18:17:55
 
 
raj thackeray and uddhav thackeray
  
 
 
 
 
मुंबई : "सभा शिवसेनेची आणि गर्दी मनसेच्या सभेची!", असे म्हणत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेपूर्वी मनसेकडून त्यासंदर्भातए एक टीजर रिलीज करण्यात आला होता. त्याचीच नक्कल आता शिवसेनेने केल्याचे गजानन काळे यांनी म्हटले. १४ मे रोजी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीजर बुधवारी (दि. ११ मे) शिवसेनेच्या सोशल मीडिया पेजवर प्रदर्शित करण्यात आला. मात्र या नादात शिवसेना चांगलीच तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.
 
 
 

 

 
 
 
 
 
"असली नकली म्हणणाऱ्यांनी पहिले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. काहीतरी अस्सल तुमचेही असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? घोळ लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की; नकली हिंदुत्ववादी!'', असे गजानन काळे यांनी ट्विटर करत म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0