नेपाळचे भारताला साकडे! : ६० वर्षे अपूर्ण प्रकल्पासाठी घेणार मोदींची मदत

गेल्या तेरा वर्षांपासून फसवतोय चीन

    दिनांक  11-May-2022 15:00:25
|
modi 
 
नवी दिल्ली: बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दि .१६ मे रोजी नेपाळच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौर्यादरम्यान 'पश्चिम सेती प्रकल्प' विकसित करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा वजा विनंती करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. गेल्या ६ दशकांपासून गुंतवणुकीअभावी हा प्रकल्प रखडला आहे.
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी त्यांच्या जन्मगावी दादेलधुरा येथे एका मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, पश्चिम सेती प्रकल्पावर मोदींशी चर्चा केली जाईल. नेपाळमधील पश्चिम सेती नदीवर उभारण्यात येणारा ७५० मेगावॅटचा प्रस्तावित पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा दशकांपासून कागदावरच अडकून पडला आहे. अलीकडेच नेपाळ सरकारने पश्चिम सेती आणि सेती नदी मिळून १२०० मेगावॅट क्षमतेच्या संयुक्त साठवण प्रकल्पाची पुनर्रचना केली आहे.
नेपाळचे पंतप्रधान देउबा म्हणाले, “आम्ही या प्रकल्पात गुंतवणूक करू शकलो नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात आम्ही हा विषय त्यांच्याकडे मांडू. देउबा यांच्या म्हणण्यानुसार, भारत सरकार नेपाळमधील चिनी कंपन्यांनी निर्माण केलेली ऊर्जा खरेदी करण्यास अनुरूप नाही. नवीन प्रकल्पाच्या विकासासाठी विश्वासार्ह भारतीय कंपनीशी निर्णायक वाटाघाटी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कोरड्या हंगामात [हिवाळ्यात] ऊर्जा सुरक्षिततेसाठी आम्हाला 'स्टोरेज' प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. यासोबतच, पश्चिम सेती व्यतिरिक्त, सरकारने' पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प' विकसित करण्यासाठी भारताशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प हा १९९६ मध्ये नेपाळ आणि भारत यांच्यात झालेल्या महाकाली कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु हा प्रकल्प देखील अनेक दशकांपासून मतभेदांमुळे अर्धवट अवस्थेत आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.