प्रवेश परीक्षांचा सराव एका क्लिकवर; भाजपकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

10 May 2022 13:20:05

Upakram
 
 
 
मुंबई : अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा सीईटी, नीट आणि जेईई सारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी भाजपकडून एक अभिनय उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षांसाठी योग्य प्रकारे सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. 'ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरियल सेट' हा उपक्रम भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी मोफत सुरू केला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १० मे) संबंधित संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
 
 
 
अधिकाधिक प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी चाचण्यांचा पर्यायही उपलब्ध करून दिल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना www.divyadholay.com या पोर्टलवर नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेनुसार प्रत्येकी ३० प्रश्नांची प्रश्नपत्रिका पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा लांब सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन दिव्या ढोले यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0