नाशिकमध्ये गावकऱ्यांकडून वनरक्षकांना मारहाण!

10 May 2022 18:04:24
fd
 
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी): नाशिकच्या पूर्व भागातील उंबरठाण गावात कर्तव्यावर असलेल्या चार वनरक्षकांना दि. ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास मारहाण करण्यात आली. उंबरपाडा या गावातील ३०-४० जणांनी दगडफेक करत मारहाण केली.
 
 
उंबरपाडा गावातून अवैध खैर झाडाचे लाकूड ट्रॅक्टरद्वारे नेत असल्याची माहिती या वन रक्षकांना मिळाली होती. वरिष्ठांना या बाबत माहिती दिल्यानंतर वनरक्षक घटना स्थळी दाखल झाले. खैराच्या लाकडाने भरलेला ट्रॅक्टरच्या चालकाला पकडले असता, लाकूड भरणाऱ्या मजुरांनी पलायन केले. त्यानंतर काही वेळातच उंबरपाडा गावातील 30 ते 40 लोक तिथे जमा झाले आणि चारही वनरक्षकांवर दगडफ़ेक केली व जबरदस्त मारहाण केली. यामध्ये चारही वनरक्षक हे गंभिर जख्मी झाले आहेत. सर्व वन कर्मचारी या घटनेचा जाहिर निषेध केला आहे. त्याच सोबत सर्व आरोपींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी प्रधान मुख्य वनरक्षक (वनबल) यांच्या कडे करण्यात आली आहे. या बाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने नागपूरला दिले.
 
 
दोषींवर कडक कारवाई न झाल्यास महाराष्ट्रामध्ये कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वनक्षेत्रामध्ये अवैद्य अतिक्रमण काढ़णे धाडी टाकणे असे गुन्हे रोखण्यासाठी वरीष्ठ अधिकारी व एस.आर.पी पोलिस सोबत असल्याशिवाय वनरक्षक व वनपाल गुन्हा रोखण्यास जाणार नाहीत असे या पत्रात नमूद केले आहे. मारहाण झालेल्या वनरक्षकांचे नाव रामजी कुंवर, जे. जी. रामचौरे, हिरामण थलील, अक्षय पाडवी, असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0