देशविरोधी भूमिका घेणार्‍या ‘युट्यूब चॅनेल्स’ना तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2022
Total Views |
 
fake
 
 
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक व्यवस्थेविषयी खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 भारतीय आणि चार पाकिस्तानी ‘युट्यूब चॅनेल्स’वर बंदीची कारवाई केली. ‘माहिती-तंत्रज्ञान कायदा, 2021’ अंतर्गत प्रथमच भारतीय ‘युट्यूब चॅनेल’वर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
 
‘युट्यूब चॅनेल’, फेसबुक, ट्विटर आणि विविध संकेतस्थळांवर भारतविरोधी मजकुराचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानस्थित व्यक्तींचा सहभाग आहे. मात्र, भारतामध्येही अशाप्रकारचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या घटनांवर कारवाई करण्यासाठी माहिती व ‘प्रसारण मंत्रालयाद्वारे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021’ चा आधार घेतला जातो. मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या ताज्या कारवाईमध्ये 18 भारतीय आणि चार पाकिस्तानी ‘युट्यूब चॅनेल’चा समावेश आहे. त्याचप्रमाणे ट्विटरची तीन खाती, फेसबुकचे एक खाते आणि एका वृत्तसंकेतस्थळावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
 
 
भारतीय सशस्त्र दल, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवर ‘फेक न्यूज’ करण्यासाठी अनेक ‘युट्यूब’ वाहिन्यांचा वापर केला जात होता. ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आलेल्या मजकुरामध्ये पाकिस्तानमधून समन्वित पद्धतीने चालवल्या जाणार्‍या एकाहून अधिक सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरून पोस्ट केलेल्या काही भारतविरोधी मजकुराचाही समावेश आहे. युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्रसंबंध धोक्यात आणण्याच्या उद्देशाने या युट्यूब आधारित भारतीय वाहिन्यांवरून मोठ्या प्रमाणात खोटी माहिती प्रसारित केली गेल्याचे आढळून आले आहे.
 
खोटी माहिती प्रसारित करणार्‍या भारतीय ‘युट्यूब चॅनेल्स’द्वारे खासगी व वृत्तवाहिन्यांच्या लोगोंसह वृत्तनिवेदकांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात येत होता. दर्शकांचा बातमी खरी असण्यावर विश्वास बसावा, यासाठी असे करण्यात येत होते. मजकुराचा प्रसार वाढवण्यासाठी व्हिडिओचे शीर्षक आणि लघुप्रतिमा वारंवार बदलण्यात येत होत्या. काही प्रकरणांमध्ये भारतविरोधी बनावट बातम्या पाकिस्तानमधून पद्धतशीरपणे प्रसारित करण्यात येत असल्याचेही पुढे आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@