डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम पदाधिका:यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त क रीत भावनिक पोस्ट केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात मनसेतील मुस्लीम पदाधिका:यांची बैठक घेऊन काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यात येणार आहे.मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा फ्लॅशबॅक आठवला आणि डोळ्य़ात पाणी आले असे म्हटले आहे. या पोस्टविषयी बोलताना इरफान शेख म्हणाले, पक्षप्रमुखांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारू लागला आहे की पक्षाची नेमकी भूमिका काय आहे. पक्षात नेमके चालंलय काय?इरफान शेख हे पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य आहेत. 2009 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिममधून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी मुस्लिम मतदारांना मतदान केले होते. पक्षाच्या कार्यकत्र्यानी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. 2019 साली मनसे आमदार राजू पाटील यांना कचोरे, नेतिवली, डायघर विभागातून मतदान झाले आहे. मशीदीवरील भोंगे आणि त्यावरून दिली जाणारी बांग यासंदर्भात विशिष्ट डेसीबल, वेळ आणि अंतराची मर्यादा न्यायालयाने ठरवून दिली आहे. ही समुपदेशन करून करण्यात आली असती. पण पक्ष प्रमुखांनी अशा प्रकारची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे शेख यांनी म्हटले आहे.
-----------------------------------------------------------------