देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डायलिसिस’ केंद्राचे लोकार्पण

30 Apr 2022 17:26:00

devendra fadnavis
 
 
 
 
मुंबई : आ. प्रसाद लाड यांच्या ’मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ व विश्व हिंदू परिषद (कोकण प्रांत) अंतर्गत ’शिव कल्याण केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने दहा बेडचे छत्रपती शिवाजी महाराज ‘डायलिसिस’ केंद्र, संजय गांधी नगर, हायवे अपार्टमेंट समोर, सायन-पनवेल हायवे, सायन येथे उभारण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता या केंद्राचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार असून, माजी मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा, आ. कालिदास कोळंबकर, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
यावेळी आ. प्रसाद लाड यांच्या वार्षिक कार्य अहवालाचेदेखील प्रकाशन होणार आहे. आ. लाड यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना तसेच सभागृहात व सभागृहाच्या बाहेर केलेल्या कामांचा आढावा या अहवालात घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. प्रसाद लाड यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0