शपथविधीनंतर महिनाभरातच उघडं पडलं आपचं पितळ! : १० ते १२ तास बत्तीगुल!

29 Apr 2022 14:58:50
 
panjab
 
 
चंदीगढ : पंजाबमधील नागरिकांना मोफत विजेचे आश्वासन देत, मतदारांना भुलवत सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीचे हे आश्वासन महिन्या भरातच खोटे ठरले. पंजाबमधील विजेची मागणी प्रचंड वाढूनही, विजेचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे पंजाबमध्ये नागरिकांना तब्बल १०-१२ तास अंधारात काढावे लागले. रोप आणि तलवंडी साबो या वीज निर्मिती केंद्रांमधील एक बंद पडल्यामुळे ही परिस्थिती ओढवली अशी माहिती समोर आली आहे.
 
 
 
 
इतर राज्यांकडून वीज खरेदीसाठी तब्बल २९४ कोटी खर्च करूनसुद्धा ८०० मेगावॅटची तूट राहिली. अचानक वीज बंद झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला काही ठिकाणी गुरुद्वारांमधून शेवटी घोषणा करून नागरिकांच्या सहयोगासाठी आवाहन करावे लागले. पंजाबचे ऊर्जामंत्री हरभजनसिंग यांनी "या वर्षी नेहमीपेक्षा विजेची मागणी ४० टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे ही स्थिती ओढवली आहे अशी सारवासारव करणारी प्रतिक्रिया दिली."
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0