मुंब्यातील भोंगे उतरवले जाणार नाहीत, मौलवींचे राज ठाकरेंना आव्हान

29 Apr 2022 16:01:20
 
mumbra
 
 
ठाणे: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतवरवण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिली आहे, या पार्शवभूमीवर मुंब्यातील मौलवींनी या अल्टिमेटमला विरोध केला असून कुठल्याही परिस्थितीत भोंगे उतरवले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याचे पालन आम्ही नक्की करू असे सांगितले आहे.
 
 
 
आम्हांला इथली शांतता सुव्यवस्था बिघडवायची नाही, आम्ही कुणाचाही अनादर करत नाही असे मौलवींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. मनसेने या भोंग्यांच्या विरोधात जोरदार मोहीम छेडली असून संपूर्ण राज्यभर या मुद्द्यावरून रान पेटवले आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी मुंब्यातील मशिदींबाहेर हनुमान चाळीस म्हणणार असल्याचे आव्हान दिले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0